– महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण ०६ लाख रुपयांचे बक्षीस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : नागरिकांची हत्या गडचिरोली जिल्हा सन १९८० पासुन माओवादाच्या प्रभावाने ग्रासलेला आहे. या कालावधीत माओवाद्यांनी निरपराध करणे, जाळपोळ करुन विकास कामांमध्ये अडथळा आणणे तसेच विविध कंत्राटदारांकडु न खंडणी वसूल करणे इ. देशविघातक कृत्य केलेले आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी माओवाद्यांकडे सुरक्षित पुरवठा साखळी असणे आवश्यक आहे.
आज १७ ऑक्टोबर २०२३ रोजी जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो (वय ५०) वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरून विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ १९१ बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन २०२३ साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ००१३/२०२३ कलम ३०७, ३५३, १४३, १४८, १४९, १२० (ब) भादवी, ३/२५, ५/२७ भारतीय हत्यार कायदा, ३, ४ भारतीय स्फोटक कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा व १३, १६, १८(अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.
सदर जहाल माओवादी मेस्सो कवडो हा माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तो नेहमी माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत असल्याने त्याची अटक गडचिरोली पोलीस दलासाठी महत्वाची ठरलेली आहे. तो १४ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक झालेला जहाल माओवादी डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्या सोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने माओवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.
अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती :
नामे मेस्सो गिल्लू कवडो
दलममधील कार्यकाळ :
+ सन २०१७ च्या आधी माओवाद्यांना जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलीस पार्टी आल्याचे निरोप देणे इ. काम करत होता.
+ सन २०१७ ला सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०२३ पर्यंत कार्यरत.
+ सन २०२३ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन आजपर्यंत कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे :
चकमक – २ :
+ माहे नोव्हे./डिसेंबर २०१७ मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
+ माहे मार्च २०२३ मध्ये मौजा मौजा हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.
खुन – २ :
+ सन २०२१/२२ मध्ये मध्ये मौजा रामनटोला तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
+ सन २०२२ मध्ये पुन्हा मौजा दोड्डुर तह. एटापल्ली जि. गडचिरोली येथे झालेल्या गाव पाटलाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
जाळपोळ – १ :
+ सन २०२१ मध्ये मौजा ताडबैली, जि. कांकेर (छ.ग.) येथील मोबाईल टॉवर जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस :
– महाराष्ट्र शासनाने मेस्सो गिल्लू कवडो याच्या अटकेवर ०६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७२ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापूराव दडस आणि सीआरपीएफ ई/१९१ बटालीयनचे असिंस्टंट कमांडन्ट मोहीत कुमार यांचे नेतृत्वात पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे .