Latest Posts

ग्रामीण रुग्णालयात रक्त पेढी, सोनोग्राफी व मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णसेवेकरिता रक्त पेढी, सोनोग्राफी तसेच मनुष्यबळाची व्यवस्था तात्काळ करण्यात बाबत निवेदन देण्यात आले.

बल्लारपूर येथे असलेला ग्रामीण रुग्णालय असून येथे येणारे रुग्ण हे बल्लारपूर तालुक्याच्या खेड्यापाड्यातील तसेच शहरातील असतात. ग्रामीण रुग्णालय येथे गोरगरीब तसेच गंभीर आजाराचे रुग्ण येतात, गंभीर रुग्णांना त्वरित जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात येते परंतु तेथे पोहोचत पर्यंत उशीर होतो. व त्यात रुग्णाच्या मृत्यू होतो. बल्लारपूर येथील रुग्णालय असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना रक्त मिळत नाही तसेच येथे सोनोग्राफीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना चंद्रपूर रुग्णालय येथे पाठवण्यात येते परंतु तेथे फार जास्त गर्दी असल्यामुळे सोनोग्राफी करण्याकरिता संपूर्ण दिवस जातो व त्यांना त्रास सहन करावा लागतो अशा परिस्थितीत जरा गंभीर रुग्णाच्या मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केले.

बल्लारपूर तालुक्यात अनेक गाव येतात व त्याचप्रमाणे बल्लारपूर ची लोकसंख्या हे जवळपास एक लाखाचा वर असून शेती चा व्यवसाय करणारा, कोळसा संपत्ती, पेपर मिल, वन विभाग व रेल्वे जंक्शन असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार करणारे रुग्ण जास्त प्रमाणात येतात व तसेच खेड्या पाड्यातील लोकांना बल्लारशा मध्ये उपचार करावा लागतात त्यामुळे त्यांना रक्ताची कमतरता व सोनोग्राफीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना चंद्रपूर हलवण्यात येते. हा सगळ्या त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित रक्त पेढी, सोनोग्राफी व मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष बल्लारपूर वंचित बहुजन युवा आघाडी यांनी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांना निवेदन देऊन केले आहे.

यावेळी सरोज झाडे, सुहास दुबे, शुभम सोनटक्के, हर्षल भसारकर, मयंक मून, अंकित अहिरवार, प्रज्योत करमनकर, आशिष निमसरकार अभिषेक दुर्गे, सागर गेडाम सह वंचित बहुजन युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss