विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीतील मौजा चेक नवेगाव शिवारात १२ एप्रिल २०२१ चे दुपारी ०२:०० या दरम्यान आरोपी भुजंग झित्रु कन्नाके (५२) याने आपली सुन गिता दिपक कन्नाके हीचे सोबत
घरघुती कारणावरून वाद घालुन दगडी फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार करून ठार केले.
अशा फिर्यादीचे तक्रारी वरून नमुद कलमान्वये पोस्टे पोंभुर्णा येथे १३ एप्रिल २०२१ वे ००:२१ वा. गुन्हा नोंद केला व सदर गुन्हयाचा तपास पोउपनी दादाजी ओलालवार पोस्टें पोंभुर्णा यांनी केला असुन प्रकरणातील आरोपीतां विरुध्द सबळ साक्षपुरावा गोळा करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
सदर खटला कोर्ट विद्यमान प्रशांत काळे सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावे नोंदविण्यात आले.
३० मार्च २०२४ रोजी आरोपी भुजंग झित्रु कन्नाके (५२) यास कलम ३०२ भादवी अन्वये जन्मठेपेची शिक्षा व ५०० रू. दंड व दंड न भरल्यास ०६ महीने अतिरीक्त कारावास अशी शिक्षा देण्यात आली.
सदर गुन्हयात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता सिमा रामटेके तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा सुधाकर तोडासे ब.न.२०९७ पोस्टे पोंभुर्णा यांनी मोलावी कामगीरी बजावली.