Latest Posts

हत्याकांडातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व २ लाख ७५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

– विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस स्टेशन देसाईगंज येथे २४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी तान्हापोळयाच्या दिवशी ०७.३० वा. ते ०७.४५ वा. च्या सुमारास मयत दिनेश दिगांबर झिलपे (३७) रा. कोंढाळा याचा भर चौकात आरोपी शामराव सोमा अलोने त्याचा मुलगा आरोपी विनायक शामराव अलोने व आरोपी राजु ढोरे सर्व राहणार कोंढाळा यांनी गोपाल कसारे यांच्या पानठेल्याजवळ लोखंडी रॉड व पावडयाने मारून निर्घणपने हत्या करून मयताचे प्रेत हे कोंढाळा ते रवि रोडवर जंगलामध्ये फेकुन दिले.

याबाबत मयताचे वडील दिगांबर झिलपे यांनी पोलीस स्टेशन देसाईगंज येथे फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अप.क्र ३६७/२०१७ कलम ३०२, २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना २७ ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात आली. तपासामध्ये असे निदर्शनास आले की, मयत दिनेश यास दारूचे व्यसन होते. आरोपी शामराव अलोने याने त्याच्या दुकानासमोर एक वर्षापुर्वी मयत दिनेश याच्या पायावर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला होता, परंतु त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोपी शामराव याने खर्च केला होता. त्यामुळे त्याबाबतची रिपोर्ट पोलीस स्टेशनला देण्यात आली नव्हती. परंतु काही दिवसाने आरोपी शामराव व त्याचा मुलगा विनायक हे पैशाची मागणी मयताकडे करू लागले. त्यावरून जुन्या रागावरून सदरचे हत्याकांड घडुन आले. घटनेच्या दिवशी मयताची पत्नी निता दिनेश झिलपे हो मयताला चौकातुन घरी आणण्यासाठी गेली असता, तिला मयताला तिन्ही आरोपी यांनी पावड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करीत असल्याचे दिसले. त्याबाबत तिने तिचे सासरे दिगांबर झिलपे यांना माहिती दिली.

त्यावरून फोनदवारे पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळावर मयताचे प्रेत आढळून आले नाही, परंतु मयताचे चप्पल, मोबाईल व रक्ताने माखलेली जागा दिसुन आली. तपासादरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर मयताचे प्रेत आरोपी शामराव यांनी लपवून ठेवलेली जागा दाखविली व मयताचे प्रेत ताव्यात घेण्यात आले. आरोपीच्या कपडयांवर रक्ताचे डाग आढळुन आले. तसेच लोखंडी रॉड व पावडयावर रक्ताचे डाग आढळून आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल व ईतर पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले. त्यावरून सेशन केस क्र. ८७/२०१७ नुसार खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा योग्य व न्यायोचित ग्राहय धरुन आज २१ मे २०२४ रोजी आरोपी शामराव अलोने (५७) व राजु ढोरे, (३६) दोन्ही रा. कोंढाळा यांना कलम ३०२, २०१, ३४ भादवी अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी १ लाख रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी विनायक अलोने (३७) यास कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेप व ७५ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रू. २ लाख ७५ हजार मयताची विधवा पत्नी निता दिनेश झिलपे हिला देण्याबाबतचा आदेश पारित करण्यात आला.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान व सहा. सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले. तसेच गुन्हयाचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा शैलेश काळे, सपोनि./अतुल श्रावन तवाडे, पोस्टे देसाईगंज यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss