Latest Posts

अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व

– भामरागड तालुक्यातील बारा पैकी पाच ग्रामपंचायतींवर आविसं व अजयभाऊ मित्रपरिवाराचे उमेदवारांचे अविरोध सत्ता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : जिल्ह्यात १११ ग्राम पंचायतीचे सार्वत्रिक व पोटनिवडणूका होत असून या निवडणुकांमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम व माजी राज्यमंत्री अंम्बरीशराव आत्राम यांच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातही निवडणुकांचे बिगुल वाजले असून या मतदारसंघात आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार आणि ग्रामसभेने तब्बल आठ ग्राम पंचायतींवर अविरोध सत्ता मिळविले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमध्ये अनेक ग्राम पंचायतीची सार्वत्रिक व पोटनिवडणुका होत असून या निवडणुकांमध्ये भामरागड तालुक्यात  तब्बल पाच ग्रामपंचायतींवर अविरोध सत्ता काबीज करत आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते जि.प.माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी आपले वर्चस्व दाखवत आजी-मंत्र्यांसमोर तगडा आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे अविरोध निवडून आलेल्या परायणार, नेलगुंडा, धिंरगी, कुव्वाकोडी आणि होडरी या पाच ग्राम पंचायतमध्ये आजी-माजी मंत्र्यांच्या राजकीय पक्षांना नामांकन भरायला उमेदवारच मिळाले नाही.

भामरागड तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये अविरोध निवडून आलेल्यांमध्ये परायणारचे सरपंच म्हणून महाका नंदू चक्कु, नेलगुंडा येथे वाचामी रोशनी दिलीप, धिरंगी येथे पारसा, संगीता, प्रशांत तर कुव्वाकोडी येथे उसेंडी सोमरी संनू आणि होडरी येथे काळागा, किशोर, मालू आदी सरपंच सह या ग्राम पंचायती मधील सदस्य ही अविरोध निवडून आले.

दुसरीकडे याच मतदारसंघातल्या एटापल्ली तालुक्यातील सहा ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन ग्राम पंचायतींवर ग्रामसभेने अविरोध सत्ता प्रस्थापित केल्याने इथेही आजी-माजी मंत्र्यांना चपराक बसली आहे.इथे निवडून आलेल्या ग्रामसभा उमेदवारांची यशस्वी नेतृत्व महाग्रामसभा तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी व प्रज्वल नागुलवारसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आजी-माजी मंत्र्यांच्या  अहेरी विधानसभा मतदार संघात यापूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही आविसं नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बाजार समितीवर आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे एकहाती सत्ता स्थापन करून आजी – माजी मंत्र्यांना जबर धक्का दिले होते.

भामरागड तालुक्यातील पाच ग्राम पंचायतींमध्ये अविरोध सत्ता आणण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात आविस व अजय मित्र परिवाराचे लक्ष्मीकांत बोगामी, सुधारक तिम्मा, सैनू आत्राम, विष्णू मडावी, श्यामराव येरकलवार, लालसू आत्राम, सुखराम मडावी, प्रभाकर मडावी, चिंनू सडमेक, महेश वरसे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ग्राम पंचायत निवडणुकांना अनन्य महत्व असतात.ग्रामीण भागात विकासाचे जाळे पसरवायला ग्राम पंचायत हे एकमेव प्रभावी सार्वभौम संस्था आहे. अश्या महत्वपूर्ण संस्थांच्या निवडणुकांमध्ये अहेरी विधानसभा मतदार संघात अविरोध झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये आजी-माजी मंत्र्यांच्या बाजूने नामांकन भरायला सुद्धा एकही उमेदवार मिळू नये, हे खरचं सगळीकडे चर्चेचा विषय ठरू लागले.

Latest Posts

Don't Miss