Latest Posts

अखेर महिलेचा बळी घेणारी टी- १३ वाघीण जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिराेली (Gadchiroli) : आज २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मौजा मुलुरचक येथील सर्व्हे क्रमांक १२/१ मध्ये नरभक्षक वाघीनीला सकाळी ८.०० वाजता जेरबंद करण्यात आले.

१९ ऑक्टोबर २०२३ ला मौजा रामाळा येथील शेतशिवारात तारा एकनाथ धोडरे (७६) ही धान कापण्याकरीता गेली असता सदरच्या T-१३ वाघीनीने हल्ला करून ठार केले होते. तीला रेस्कु करण्याकरीता डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ता.अं.व्या. प्र. चंद्रपुर व शुटर अजय मराठे यांची चमू त्याच दिवसी आरमोरी परिक्षेत्रात दाखल झाली. वाघीनीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचुन Camera Trap लावुन अवघ्या ३ दिवसात वाघीनीला पकडण्यात यश आले. वाघीनीला आता गोरेवाडा TTC येथे नेण्यात येणार आहे. वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रवि मधिल सर्व्हे क्रमांक १२/१ मध्ये जेरबंद केले.

सदरची कार्यवाही एस. रमेशकुमार, वनसंरक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धर्मविर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वडसा, संदिप भारती, सहाय्यक वनसंरक्षक, वडसा वनविभाग, वडसा पवनकुमार जोग, परिविक्षाधीन (भा.व.से.), वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी, अविनाश मेश्राम, वपअ आरमोरी (सलग्न), राजेंद्र कुंभोर, क्षेत्र सहाय्यक आरमोरी, अजय उरकुडे, पाटील, साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर येथील चमु मध्ये दिपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, निकेश शेंदे, मनान शेख तसेच गडचिरोली RRT चमु दलातील आशिष भोयर, अजय कुकडकर, मकसुद सय्यद, गुणवंत बावनथडे, पंकज फरकडे, निखील बारसागडे व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss