Latest Posts

उन्हातून आल्यानंतर काय काळजी घ्यावी : तज्ञाचा सल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. अनेक व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशा वेळी जर उन्हातुन घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी पिल्यास शरीराच्या तापमानात बदल होऊन सर्दी किंवा ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरुन घरी आल्यानंतर प्रथम शरीराचे तापमान खोलीच्या तापमाना इतके होऊ दयावे. त्यानंतरच थंड पाणी प्यावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच उन्हाळ्यातील आजारांचा टेंड कायम आहे. उष्णतेमुळे अनेक व्यक्ती डिहायड्रेशनचे बळी ठरतात. असे असुनही उन्हात बाहेर पडतांना आपण निष्काळजीपणा करतो जेव्हा आपण कडक उन्हातुन घरी जातो तेव्हा अंगातील उष्णता कमी करण्यासाठी फ्रीज मधील थंड पाणी पितो. मग असे न करता आधी योग्यवेळ घरात शांत बसुन राहावे. १० ते २० मिनिटांने थंड पाणी प्यावे. शरीरातील उष्णता घरातील तापमानाऐवढी म्हणजे नार्मल तापमान होऊन आजार पणाचा धोका कमी करता येतो.

कडक उन्हातुन आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे घसाला कोरड पडते. अशा वेळी आपणास थंड पाणी पिण्याची इच्छा होते. परंतु उन्हातुन आल्याबरोबर थंड पाणी पिणे शरीरासाठी हाणीकारक आहे. असे तज्ञाचे मत आहे. उन्हाळ्यात शरीराला पाण्याचा पुरवठा होईल असा आहार घ्यावा. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी भरपुर फळे आणि भाज्याच्या ज्युसचा आहारात समावेश करावा.

ऊन लागण्याची लक्षणे- उन्हाळी लागणे (लघवील जळजळ, गरम लघवी होणे) घसाला कोरड येणे, अशक्तपणा व चक्कर येणे, अस्वस्थ व बेचेन वाटणे

उन्हातुन आल्यावर घ्यावयाची काळजी- उन्हातुन आल्यानंतर लगेच एसी किंवा कुलरच्या हवेत बसु नये. फ्रिजचे थंड पाणी पिऊ नये. थोडा वेळ थांबुन नंतर पाणी प्यावे. थंड पाण्याने आंघोळ टाळावे. थोडा वेळ विश्रांती घ्यावी व नंतर कामे करावी.

उन्हात बाहेर पडतांना घ्यावयाची काळजी- शरीर पुर्ण झाकणारे फिकट रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे कपडेवापरावे. डोक्याला उन लागु नये म्हणुन रुमालाचा वापर करावा. डोळ्याला गॉगल वापरावा. दुपारी १२ ते ३ च्या वेळेत घरात राहावे. ज्युस पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. तहान नसतांनाही थोडे थोडे पाणी पिणे सुरु ठेवावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss