Latest Posts

चीनमध्ये कोरोनानंतर पसरला नवा आजार : लहान मुलांमध्ये वाढतोय सर्वाधिक धोका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : जगभरातील करोनाची चिंता मिटली असताना आता पुन्हा एकदा चीनमध्ये धडकी भरवणारा आजार उद्धभवला आहे. या नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

चीनच्या शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. यामुळे तेथील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, या मुलांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत. त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत.

चीनमधील सध्याची स्थिती करोना काळाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. लहान मुलांना झपाट्याने होणाऱ्या या आजाराबाबत WHO नेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आजारात मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे. उच्च तापासह अनेक असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय नाक वाहणे, खोकला, उलट्या आणि जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहे.

चीनमध्ये पसरणाऱ्या विचित्र प्रकाराबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO देखील अलर्ट झाले आहे. WHO ने चिनी सरकारकडून मुलांमधील श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियाबाबत संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे. या नवीन आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले की, चिनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिकाऱ्यांनी १२ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

WHO ने या रहस्यमयी आजाराच्या उद्रेकासाठी कोविड-१९ निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवलाय. WHO ने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-२, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवली. तसेच हा रोग अत्यंत संसर्गजन्य असू शकतो, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.

Latest Posts

Don't Miss