Latest Posts

आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतरही ३८ टक्के बेरोजगार : आरटीआयमधून आकडेवारी समोर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : इंजिनीअरिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आयआयटी स्वप्न असते. आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळते. पण एका आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये २३ कॅम्पसमध्ये जवळपास ३८ टक्के उमेदवारांना अद्याप नोकऱ्या मिळालेल्या नाही.

आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी दाखल केलेल्या आरटीआयमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दिल्ली आयआयटीने आपल्या पास झालेले विद्यार्थी आणि सध्याच्या बॅचच्या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी इंजिनीअरिंगची नियुक्ती करणाऱ्या कंपनींना मेलही पाठवले आहेत.

आयआयटी मुबंई आाणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ॲण्ड सायन्सनेही असेच केले आहे. आयआयटी दिल्लीमध्ये ॲकेडमीक सेषन २०२३-२०२४ चे प्लेसमेण्ट सत्र संपणार आहे. आरटीआयनुसार, जवळपास ४०० विद्यार्थ्यांना आतापर्यंत नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी मोठे आव्हान समोर येत आहे. धीरज सिंग यांनी दाखल केलेल्या आरटीआयनुसार, मागच्या वर्षी ३२९ विद्यार्थ्यांना प्लेसमेण्ट मिळाली नव्हती आणि २०२२ मध्ये १७१ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नव्हती.

आरटीआयनुसार, या वर्षी सर्व २३ आयआयटीमध्ये ७ हजार हून अधिक आयआयटी विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेण्टच्या माध्यमातून नोकरी मिळू शकलेली नाही. दोन वर्षापूर्वी ही संख्या ३ हजार ४०० होती. नोकरी मिळण्याचा टक्का कमी होत असताना प्लेसमेंटसाठी पात्र होणाऱ्यांची संख्या १.२ पटीने वाढली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक ठिकाणी प्लेसमेण्ट कमी आहे. जर कोणत्याही संस्थेकडून सांगितले जात असेल की त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तर नोकरीची गुणवत्ता चांगली नसेल. हे पहिलेच वर्ष आहे जेव्हा चॅटजीपीटी आणि मोठे लॅग्वेज मॉडेलनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.

Latest Posts

Don't Miss