Latest Posts

अहेरी आगारात नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात यावे : अन्यथा आगाराला कुलूप ठोकणार

– माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी इशारा देत मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : आगारातील जवळपास निम्म्या बसेसची अवस्था फार गंभीर झाली आहे. प्रवासावर निघालेल्या या बसेस कधी मध्येच बंद पडतील याचा काही नेम नाही. त्यामुळे प्रवाशांना कित्येक तास ताटकळत राहावे लागते. मागील काही वर्षापासून रस्त्यावरील खड्डे, भंगार बससेवा व अहेरी विधानसभा क्षेत्रातील काही ठिकाणी बस सेवा सुरू नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नाईलाजास्तव जीव धोक्यात टाकून त्याच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसून येत आहे.याकरिता आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांन समवेत अहेरी आगारात जाऊन विभागीय नियंत्रक गडचिरोली व आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली चर्चे दरम्यान आम्हाला आजच्या आज लेखी पत्र देऊन सदर बस सेवा नियमित सुरू करून नवीन बसेसची मागणी येत्या १० दहा दिवसात पुर्ण न झाल्यास आवीस अजय भाऊ मिञ परिवाराकडून अहेरी आगाराला कुलप ठोकण्यात येईल असा इशारा अजयभाऊ कंकडालवार यांनी केला असता. विभागीय नियंत्रक गडचिरोली व आगार व्यवस्थापक, यांनी अहेरी आगारातील १० बसेस विभागीय कार्य शाळा चंद्रपूर येते दुरुस्ती करीता पाठवण्यात आले आहे. त्या १० बसेस येत्या ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अहेरी आगारात चालवण्या करीता देण्याची ग्वाही दिली.

यावेळी माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी जि.प. सदस्य सुनिता कुसनाके, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, अवालमरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मारोती मडावी, नरेंद्र गर्गम, अतुल आत्राम, मुत्ताजी पोरतेट, शंकर आतकुरवार, अजय वणपकलवार, प्रमोद गोडशेलवारसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेकडो नागरिक व आविसं अजयभाऊ मिञ परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss