Latest Posts

अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त गावातील अनेकांनी केला भाजपात प्रवेश

– युवा वर्गात राजेंच्या प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त पेरमिली व कोरेली भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम तथा सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली या गावातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत नुकताच राजेंचा वाढदिवसाच्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी अहेरी येथील रुक्मिणी महालात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले. विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे, तुमचा विश्वासघात कदापी होहु देणार नाही, तुमचा क्षेत्रांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले. त्याला राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे. तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे.

Latest Posts

Don't Miss