Latest Posts

अहेरी शहरातील शिवाजीनगर प्रभागातील विविध विकासकामांचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन/लोकार्पण संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी शहरातील शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक ६ मधील १ कोटी ८० लक्ष रुपयांचा सिमेंट रोड, नाली सह विविध विकासकामांचे भूमिपूजन तथा लोकार्पण माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते काल ३ डिसेंबर रोजी संपन्न झाले.

प्रभागातील गेल्या अनेक वर्षांची समस्या या प्रभागातील भाजपाचा नगरसेविका दिपाली मुकेश नामेवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सोडविल्याने शिवाजीनगर प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे, या कार्यक्रमाला युवानेते अवधेशराव, चितेश्वरराव, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss