Latest Posts

अहेरी वरून अमरावतीला निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसचा अपघात : वाहकासह दोन महिला गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरी वरून अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बसला अपघात झाला आहे. ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्या जवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सदर अपघातात वाहकासह दोन महिला प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

माहितीनुसार, अहेरी आगाराची एम एच-०७ सी-९४६३ क्रमांकाची बस जवळपास २७ प्रवाशांना घेऊन सकाळी ८.३० वजता अमरावती करीता निघाली. अहेरी वरून वर्धा मार्ग ही बस अमरावती ला जाते. अहेरी वरून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.

या वाहनात चालक पी.आर. मेश्राम आणि वाहक डी.एस. मेश्राम होते. च्या सोबत जवळपास २७ प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते. त्यातील वाहक डी.एस. मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. चेस म्हणजे या बस मध्ये वाहक असलेले डी.एस. मेश्राम यांची मुलगी सुद्धा प्रवासी म्हणून होती. तिला सुद्धा दुखापत झाली आहे.

Latest Posts

Don't Miss