– राजेंच्या चाहत्यांचा दानशूरचा राजा गणेश मंडळ अहेरीकडून लाडूतुला करतांना मोठ्या उत्सवाचे स्वरूप.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी इस्टेटचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली विदर्भातील नामांकित धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्य राजनगरीत मोठ्या रोषणाई, आतिषबाजी आणि डीजेच्या गजराने संपूर्ण राजनगरी दुमदुमली. उपविभागातील राजघराण्याशी संबंधित गणमान्य व्यक्ती, स्थानिक व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्थांची तथा पक्षांचे पदाधिकारी तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील वार्डा- वार्डातील महिलांनी पुष्पगुच्छ व भेट देऊन राजे साहेब यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव केला.
सकाळपासुनच विवीध ऊपक्रमांची रेलचेल –
सकाळी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भाजपा तर्फे गरजू रुग्णाला व प्रसूती मातांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले. यात अहेरी नगर पंचायत चे भाजपा गटाचे नगर सेवक, नगर सेविका आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राजे साहेबांच्या जन्मदिवसाला अहेरितील प्रसिद्ध दानशूरचा राजा गणेश मंडळाकडून अहेरी येथील दानशूर चौकात भव्य स्वरूपात रोषणाईत मोतीचुर लाडूने तुलाभार करण्यात आले.
यावेळी हजारोंचा संख्येत या आनंदमयी क्षणाला राजनगरितील जनता तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनता तसेच लागून असलेले तेलंगाना राज्यातील लोकांची गर्दी होती. त्यानंतर राजे यांच्या आझाद चौकात शिव जन्मोत्सव समिती व आझाद गणेश मंडळ अहेरी तर्फे महाराज २०२४ आकाराचे राजेंच्या हस्ते केक कापून समितीने शुभेच्छा दिली. त्यातुन आगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल काय? असणार याची जणू पुर्वकल्पनाच दिल्या गेली.
यावेळी बाल, तरुण, महिला चाहत्यांची अफाट गर्दी होती. चाहत्यांची तर सेल्फी फोटो करीता चक्क रांग लागली होती. राजे यांचे दिवसेंदिवस चाहत्यांची संख्या अगणित वाढत असल्याचे दिसून येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यात विविध ठिकाणी राजे यांच्या जन्मदिसानिमित्य विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर, फळ वाटप व सामाजिक उपक्रम राबविले गेले.
मागील काही महिण्यांपासुन सुरु असलेला पक्षप्रवेशाचा धडाका पुन्हा जन्मदिवसानिमीत्य सुध्दा दिसला. राजेंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन पेरमील्ली, मन्नेराजाराम परिसर आणि सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी रुक्मिणी महालात भाजप मध्ये प्रवेश केला.