विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल २९ ऑक्टोबर ला उपस्थिती दर्शवून विविध समाजबांधवाशी आस्थेने संवाद साधला.
राजे धर्मराव सायन्स कॉलेज येथे आयोजित कुणबी समाजाची कोजागिरी, माता कन्यका मंदिरात आयोजित कोमटी समाजाची कोजागिरी, विर ब्रह्ममगारु मंदिरात आयोजित सोनार समाजाची कोजागिरी तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पद्मशाली समाजाची कोजागिरी कार्यक्रमांना राजेंनी उपस्थिती दर्शविली. यावेळी बंधू अवधेशराव बाबा सोबत होते.
यावेळी विविध समाजबांधवानी राजेंचा शाल, श्रीफ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या समाजबांधवाची मोठी गर्दी झाली होती.