Latest Posts

अहेरीत गरबा-दांडिया व बतकम्मा नृत्याची धमाल

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर येथील स्नेहा लॉन येथे बुधवार १८ ऑक्टोबर रोजी गरबा -दांडिया व बतकम्मा नृत्य स्पर्धेची धमाल झाली.

स्पर्धेच्या उदघाटन स्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम होते तर मंचावर अध्यक्षस्थानी भावना खोब्रागडे होते, प्रमुख अतिथी म्हणुन सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, अर्चना बाळापुरकर, स्नेहल साटोरे, स्वाती जैनवार, पुष्पा अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले. यावेळी तब्बल पंधरा गृपनी स्पर्धेत सहभाग नोंदविले. दांडीया-गरबा नृत्यासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये रोख, द्वितीय १५ हजार रु. रोख तर तृतीय क्रमांक ११ हजार रु. रोख आणि बतकम्मा नृत्यासाठी सुद्धा याच स्वरुपात विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर व सन्मानपत्रही वितरित करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी, आपल्या भागातील युवती व महिलांना सुप्त गुणाना वाव मिळावा तसेच महिलांचे सांस्कृतिक व कलेचे विकास व्हावे. यासाठीच नवरात्रोउत्सवाच्या शुभपर्वावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. असून सहभागी स्पर्धकाना शुभेच्छा व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शनही केले.

विजेत्या गृपला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या शुभहस्ते रोख रक्कम पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविन्यात आले. स्पर्धेचे मुल्यांकण प्रा. मंगला मेश्राम, माधुरी मुड़पल्लीवार, विना लोनबले, दीपा कोकावार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गड़पल्लीवार, निवेदिता वीरगोनवार, पूर्वा दोन्तुलवार, पल्लवी दहागावकर, आरती डुकरे आदिनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक व प्रेक्षकगण उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss