विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आलापल्ली येथे सभामंडप नसल्याने प्रत्येक कार्यक्रमासाठी आलापल्ली वासियांना अडचण भासत होती. हिबाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती होताच १५ व्या वित आयोग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन सभामंडपाचे बांधकाम मंजूर करून दिले. सदर बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार याच्या हस्ते उदघाटन करण्यात आला. आलापल्ली वासियांनी अजय कंकडालवार यांचे जंगी स्वागतही करण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नागेपाल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज दुर्गे, किशोर दुर्गे, स्वप्नील चिमरलावार, विजय गुप्ता, राजीनाश रंगूवार, संजय मंथनवार, राकेश सडमेक, नरेश गर्गमसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक होते.