Latest Posts

आलापल्ली येथील बॅडमिंटनपटूला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आलापल्ली येथील मुलगी शैलू केशनवार हि नागपूर येथे होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूर जाण्यासाठी तयारी आहे.

परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या बॅडमिंटनपटू मुलीला जाणे शक्याच नसल्याने सदर बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना प्रकाश कोरेत, उमेश आत्राम, स्वामी वेलादी यांनी अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथे अजय कंकडालवार यांना भेट घेऊन मुलगीची परिस्थिती सांगण्यात आली होते. मुलीची परिस्थिती पाहून प्रकाश कोरेत, उमेश आत्राम, स्वामी वेलादी यांच्या मार्फतीने बॅडमिंटनपटू मुलीला आर्थिक मदत पाठवण्यात आली.

सदर बॅडमिंटनपटू मुलीला जाण्यासाठी अजय कंकडालवार यांच्याकडून मदत मिळाल्याची माहिती मिळताच सदर बॅडमिंटनपटू मुलगी व कुटुंबातील सर्वजण आनंदीत झाले व अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

त्यावेळी कुटुंबातील नातेवाईकांनी म्हणले की, गडचिरोली जिल्ह्यातील गोर गरिबांना प्रत्येक समस्यांसाठी समोर असतात. पुरात नुकसान झालेल्यांना पावसाळ्यात घर पडणाऱ्यांना आजारी असणाऱ्यांना अशा अनेक अडिअडचणीत प्रत्येक गरजू लोकांच्या मदतीला धावून येतात अशा देवदूत माणसाला कधीच विसरू शकणार नाही, असे बॅडमिंटनपटू मुलीच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी म्हणले. यावेळी उपस्थित आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss