विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : अखिल भारतीय नागरी सेवा बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५, ३ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रितमपुरा, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी सोमवार २३ डिसेंबर २०२४ ला कुपरेज बास्केटबॉल ग्रांऊड, सचिवालय जिमखानाजवळ, मुंबई येथे सकाळी ८ वा. आयोजित करण्यात आली आहे.
विविध राज्य शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या इच्छूक खेळाडूंनी प्रथम आपले आवेदनपत्र सचिवालय जिमखाना येथे २० डिसेंबर २०२४ पर्यंत sachivalaygym1954@gmail.com या संकेतस्थळावर सादर करावे. आवेदन पत्र सादर करणाऱ्या खेळाडूंना सदर निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सचिवालय जिमखाना, मुंबई यांचेमार्फत कळविण्यात येईल. खेळाडूंनी आपल्या कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीसह आणि कार्यमुक्ती आदेशासह निवड चाचणीस उपस्थित रहावे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जिमखाना सभासद असण्याची आवश्यकता नाही.
खेळाडूंकरीता सूचना –
१) स्वतःचे शासकीय ओळखपत्र २ झेरॉक्स प्रतिसह व कार्यमुक्ती आदेशाची मुळ प्रत निवड चाचणी अगोदर सादर करावी. २) निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आपले स्वतःचे किट (टी-शर्ट, शॉर्टस्, शूज इ.) आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
सचिवालय जिमखाना, मुंबई दूरध्वनी क्रमांक ०२२- ३५६४५३५६ किंवा मानत सचिव बास्केटबॉल संजय पोफळे (मो.८८५०३५८२६८), संजय कदम (मो. ९०८२४९१६७५), प्रताप माडकर (मो. ९७०२७०७०८८), सतीश सोनवाने (मो. ९८६९२३६३२८) आणि मकरंद गयावळ (मो. ९१३७५४१८६७) यांच्याशी संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.