– आमगाव विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : आमगाव – देवरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. महाविकास आघाडीमध्ये एक बंडखोरी झाली आहे. तर भाजपमध्येही एक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या बंडखोरीचे आव्हान या दोन्ही पक्षांना असणार आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात देवरी तालुका अध्यक्षपदी असलेले विलास चाकाटे यांनी बंड पुकारला आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असून उद्या त्यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. कॉंग्रेसकडून विलास चाकाटे यांचा मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विलास चाकाटे यांनी निवडणूक लढवणारच, अशी ठाम भूमिका जाहीर केली. अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. परंतू विलास चाकाटे यानीं आपला अर्ज कायम ठेवला आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी विलास चाकाटे यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे.
आमगाव विधानसभा मतदारसंघात भाजपमध्येही बंडखोरी झाली आहे. भाजपकडून संजय पुराम यांना उमेदवारी दिल्यानंतर सालेकसा तालुक्यातील भाजपचे नेते शंकर मडावी हे अपक्ष म्हणून मैदानात उतरवले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शंकर मडावी यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निवडणूक लढविण्यावर ठाम असून संजय पुराम यांना काही प्रमानात अडचणीचा सामना करावा लागनार आहे.
स्टँड उम्मेदवार –
१) दिलीप जुळा – बहुजन समाज पार्टी
२) राजकुमार पुराम – इंडियन नॅशनल काँग्रेस
३) संजय पूराम – भारतीय जनता पार्टी
४) देवविलास भोगारे – राष्ट्रीय गोंडवाना पार्टी
५) निकेश गावड – वंचित बहुजन आघाडी
६) वामन शेळमाके – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
७) विलास चाकाटे – अपक्ष
८) यशवंत मलये – अपक्ष
९) शंकर मडावी – अपक्ष