Latest Posts

आणखी एका युवकाला तलवार सहित अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देश नुसार स्थानिक गुन्हे शाखेने आलआऊट मोहीम राबवित पो.स्टे बल्लारपुर हद्दीतील महारणा प्रताप वार्ड येथे हातात तलवार घेवुन फिरत असाणारा व लोकांनमध्ये दहशत निर्माण करणारा इसम मनोज बिरमा डुलगज (४०) धंदा-बेरोजगार, रा. महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपुर याला लपत छपत जावुन महर्षी वाल्मीकी चौक येथे छापा टाकला असता त्याचे जवळ एक लोखंडी धारधार तलवार कि.अं ५००/- मिळुन आल्याने जप्त करण्यात आली. त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे बल्लारपुर अप के २७४/२०२४ कलम ४,२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ (१), ३७(३) म.पो.अधि. १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नमुद आरोपी यांनी तलवार सारखे घातक शस्त्रे बेकदेशिरपणे ताब्यात बाळगुन जिल्हाधिकारी चंद्रपुर एमजी/कार्या-८/टे ३/ साले/२००३/१८३२ दिनांक १४ मार्च २०२४ अन्वये कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे दुष्टीने विवक्षीत कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधक उपाय करणे तसे पुढील अगामी काळात लोकसभा निवडणुक व सन उत्सव असल्याने सदर आरोपीचे कृत्य शासकीय नियमाचे उल्लंघन करणारे असल्याने त्याचे विरूध्द वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, सपोनि हर्षल ऐकरें, सपोनि विकास गायकवाड, पोउपनि विनोद भुरले, पो. हवा सजंय आतकुलवार, पो.हवा अनुप डांगे व पोहवा मिलिंद चव्हाण, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss