Latest Posts

शिकाऊ उमेदवारांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रशिक्षणाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भंडारा विभागात दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या सत्राकरीता आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे १ व २ वर्ष कालावधीचे व्होकेशनल अभ्यासकम पुर्ण केलेल्या उत्तीर्ण उमेदतवारांनी एक वर्षासाठी कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांची ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आयोजन करण्यात आली आहे.

तसेच हे प्रकिया ०८ ते १६ जुलै, २०२४ पर्यंत ऑनलाईन पदधतीने पार पाडण्यात येत असल्याने व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांनी Skill India पोर्टल बरील www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर आधार लिंक करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर M.S.R.T.C. Bhandara या आस्थापनेकरीता (Establishment) ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.इच्छुक उमेदवारांनी नियंत्रक,राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागाशी संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss