Latest Posts

कर्जवसुलीसाठी मनमानी करणाऱ्या एजंट्सच्या मुजोरीला चाप

– सकाळी ८ आधी, संध्याकाळी ७ नंतर कर्जदारांशी संपर्क करु नये : RBI चा नवा नियम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी नवी नियमावली. वसुली एजेट कर्जधारकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी सातनंतर फोन करू शकणार नाही.

धमकीही देऊ शकणार नाही. वसूली एजंट्ससाठी आचारसंहिता बनवण्याचे निर्देशही आरबीआयने बँकांना दिले आहेत.
बँकेचे रिकव्हरी एजेट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच वसुली एजेट्सना कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिला. या अंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजेट कर्जदारांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर कॉल करू शकणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय आरबीआयने घेतला आहे.

RBI च्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा सूचना (Draft Master Direction on Managing Risks and Code of Conduct in Outsourcing of Financial Services) मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, बँका आणि NBFC सारख्या नियमन केलेल्या संस्थांनी (RE) प्रमुख व्यवस्थापनाची कार्य आउटसोर्स करू नयेत. या कामांमध्ये पॉलिसी तयार करणे आणि KYC नियमांचे पालन करणे आणि कर्ज मंजूर करणे यांचा समावेश होतो.

बँकांनी वसुली एजेटांसाठी आचारसंहिता बनवावी, RBI चे निर्देश –
आरबीआयने म्हटले आहे की, RE ने हे सुनिश्चित केले पाहिजे की, ग्राहकांप्रती त्यांची जबाबदारी आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे कमी होणार नाही. मसुद्यानुसार, बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) डायरेक्ट सेलिंग एजेट (DSA), डायरेक्ट मार्केटिंग एजेट (DMA) आणि कलेक्शन एजेट्ससाठी आचारसंहिता तयार करावी.

रिकव्हरी एजेट्सनी कर्जधारकांशी संयमाने अन् व्यवस्थित बोलावे –
DSA, DMA आणि पुनर्प्राप्ती एजेट योग्यरित्या प्रशिक्षित आहेत की नाही, हे नियमन केलेल्या संस्थांनी सुनिश्चित केले पाहिजे. जेणेकरून ते त्यांच्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने पार पाडतील. मध्यवर्ती बँकेने असे म्हटले आहे की, RE आणि त्यांचे वसुली एजेट कर्जाची वसुली करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीसोबत शाब्दिक किंवा शारीरिक, तसेच, कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. यासह, वसुली एजेट कर्जदारांचा सार्वजनिकपणे अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत.

Latest Posts

Don't Miss