Latest Posts

क्षेत्राचा सर्वांगिण विकास हाच आमचा ध्यास : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

– पेठगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे लोकार्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : जनतेने मतदान रुपी दिलेला आशीर्वाद व माझे वर दाखवलेला संपूर्ण दृढ विश्वास या विश्वासाला घेऊनच सामान्य जनतेच्या समस्यांना समूळ नष्ट करणे हेतू संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील जनतेला मूलभूत सोयी सुविधांसह अन्य सुविधा प्रदान करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून मागील दहा वर्षात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यातील पेठगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे लोकार्पण व सामाजिक सभागृहा बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित उद्घाटन सोहळा प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सचिव हरिभाऊ बारेकर, सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, कृउबा समिती उपसभापती दादाजी चौके, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे नगरसेवक पंकज ननेवार संचालक जाणकिराम वाघमारे, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष राहुल बोडणे, नवरगाव शहर काँग्रेस अध्यक्ष सुशांत बोडणे, तथा पेठगाव काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी तथा ग्रामपंचायत पेठगावचे सर्व पदाधिकारी तसेच काँग्रेस कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे आपण खेचून आणली. आज या विधानसभा क्षेत्रात शेती सिंचनाचा विषय, अंतर्गत वाहतूक मार्ग, ग्राम स्तरावर तसेच तालुकास्तरावर प्रशासकीय प्रशस्त इमारती, नागरिकांच्या आरोग्याकरिता प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, शुद्ध पेयजल तसेच अन्य नागरी मूलभूत गरजा यावर विशेष लक्ष देऊन एक लोकप्रतिनिधी नात्याने सक्षमरित्या भूमिका वठवीली. भविष्यातही या क्षेत्रात विविध विकास कामे करून या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील १ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना च्या नवीन इमारतीचे लोकार्पण व लगतच ३० लक्ष रुपयांच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पेडगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss