Latest Posts

आश्रम शाळांमध्ये केजी टू पीजी सीबीएससी पॅटर्न चे शिक्षण सुरू करा

– आमदार डॉ. देवराव होळी यांची विधानसभेत मागणी
– पुढील सत्रापासून सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण सुरू होणार मंत्र्यांचे आश्वासन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आश्रमशाळा सुरू असून या आश्रम शाळांमधून के.जी. पासून पदव्युत्तर (पीजी) पर्यंतचे शिक्षण सीबीएससी पॅटर्न मधून घेतल्यास आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासास मदत होईल. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळांमध्ये के.जी. टू पी.जी चे सीबीएससी पॅटर्न शिक्षण सुरू करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी लक्षवेधी वरील चर्चेत सहभागी होवून राज्याचे आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली.

यावेळी मंत्री यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर्षीपासून आश्रम शाळामधून सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण सुरू करण्यात येणार होते. परंतु काही तांत्रिक-कारणास्तव अडचणी आल्याने ते होऊ शकले नाही. मात्र भविष्यात या संदर्भात नक्कीच विचार करून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, मी सुध्दा आदिवासी आश्रम शाळेतील एक विद्यार्थी असून आश्रम शाळेमधून पुढे मी माझे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. मेडिकल ऑफिसर व त्यानंतर आमदार झालो. त्यामुळे मला आदिवासी आश्रम शाळेतील समस्यांची जाणीव आहे. आदिवासी आश्रम शाळांमधून अनेक विद्यार्थी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थांबतात. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळांमध्येच केजी टू केजी पर्यंतचे शिक्षण झाले तर आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

Latest Posts

Don't Miss