विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Ashti) : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक खेळ संचनालय पुणे तर्फे जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येथे २१ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या वयोगट १७/१९ मुले व मुली राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा महोत्सवामध्ये खेलो इंडिया आष्टीच्या दोन धनुर्धरांचे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.
त्यामध्ये सर्वश्री मनस्वी राजू बामनकर, निशा मिलन सरकार या दोघींनी आपला नेम साधत राज्यातील अनेक दिग्गज खेळाडूंना पराभूत करत आपले नाव राष्ट्रीय खेळ स्पर्धेकरिता कोरले आहे. यामध्ये मनस्वी राजू बामनकर सुवर्णपदक, निशा मिलन सरकार सुवर्णपदक, तथा काशीनाथ हुलके सुवर्णपदक, तसेच मुलांमध्ये सेजल कोवे कास्यपदक, स्मित जोरगलवार कास्यपदक, जय सेमले कास्यपदक, ज्ञानदीप गुरुकार कास्यपदक, नागेश भोयर कास्यपदक आदी खेळाडूंनी पदके प्राप्त केले.
त्यानिमित्य त्या सर्व धनुर्धरांचे खेलो इंडिया आष्टी गडचिरोली च्या वतीने व वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी चे उपाध्यक्ष बबलू हकीम तसेच शाहीन हकीम यांनी व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, सहाय्यक क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, सहाय्यक क्रीडा अधिकारी नाजूक उईके व तालुका क्रीडा अधिकारी घटाळे यांनी तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य शैलेंद्र खराती आष्टी, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्याल आष्टी चे प्राचार्य संजय फुलझेले, पर्यवेक्षक बैस, श्री सद्गुरू साईबाबा सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रमोदकुमार सिंग यांनी विजेत्या खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण विजयाचे श्रेय खेळाडूंनी आर्चरी चे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्राध्यापक श्याम कोरडे यांना दिले तसेच सहायक मार्गदर्शक सुशील अवसरमोल, रोशन सोळंके नितेश डोके, कौमुदी श्रीरामवार यांना दिले.