Latest Posts

आष्टी पोलिसांची धडक कारवाई : दारुसह २ लाख ९६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी (Ashti) : काल ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ २१.०० वा. च्या सुमारास गोपनीय सुत्राव्दारे मौजा चंद्रपुर ते आष्टी रोड नी एक स्विफ्ट कार क्र. एम.एच. ४३ एन ४७२ या चारचाकी वाहनाने देशी दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनीय बातमीदाराकडुन खात्रीशीर खबर मिळाली.

मिळालेल्या महीतीनुसार, पोस्टे स्टॉप यांनी नमूद वाहनास चौडमपल्ली येथे नाकाबंदी दरम्यान थांबवून तपासणी केले असता १) ४ गोण्या मध्ये ९० मिली मापाचे असे एकुण १ हजार २०० निपा प्रति निप अवैद्य विक्री किंमत ८० रुपये प्रमाणे किं.अं असा एकुण ९६ हजार रुपये चा मुद्देमाल २) एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार क्र. एम.एच. ४३ एन ४७२  जुनी वापरती कार २ लाख रुपयाचा मुद्देमाल असा एकुण २ लाख ९६ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.

सदर गाडी मधील इसम प्रफुल्ल दाजगाये (४०), धंदा- मजुरी, रा.जि. चंद्रपुर या आरोपी विरुध्द पोस्टे आष्टी अप क्र- २८४/२०२३ कलम ६५ (अ) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक चिंता, यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुदंन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल, पोशि/अतुल तोडासे, पोशि/रायसिडाम, पोशि/संतोष नागुलवार, पो.शि. मेदांडे यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss