विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : आपली ड्यूटी करून बल्लारपूर येथील क्वार्टर मध्ये परत येणाऱ्या असिस्टंट मॅनेजर ला लाकडी दांड्या ने मारून पैसे हिसकून लुटल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास सास्ती वर्धा नदी पुला जवळ घडली.
श्रीकांत तिरुपती टेकु (२७) डब्लु.सी.एल. मध्ये बी.वो.सी.एम. कंपनीत असीस्टन मॅनेजर पदावर कार्यरत आहे. ते २२ डिसेंबर रविवार रात्री १०.१५ वाजता दरम्यान ड्युटी संपल्यावर दुचाकी क्रं टीएस ०३ एफसी २ हजार ६०० ने सास्ती मार्गाने घरी परत येत असताना सास्ती पुलीयाजवळ ब्रेकर असल्याने गाडीचा वेग कमी केला तेवढ्यात तिन अनोळखी ईसम दुचाकी समोर येऊन गाडीचे हॉन्डल पकडले तसेच गाडीला व गाडी बंद करून लाकडी दंड्याने मारहाण करून पॉकीट मध्ये असलेले १ हजार ८०० रुपये जबरण काढून घेतले तसेच तुझ्या खिश्यात पैसे असेल दे नाहीतर तिघेही तुला मारल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिली तसेच काही वेळाने ते तिघेही अनोळखी पळून गेले. असिस्टंट मॅनेजर श्रीकांत टेकु यांनी आपल्या मित्राला फोन लावून मदतीकरीला बोलावले. व पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. यावरून बल्लारपूर पोलीसांनी अज्ञात आरोपीवर बीएनएस २०२३ कलम ३(५), ३०९ (६), ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिवाकर गुरनुले करीत आहे.