Latest Posts

अतिदुर्गम कोंदावाही येथे विकास कामांचे भूमिपूजन

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गोंदावाही येथे सिनेट सदस्य तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आश्रम यांच्या हस्ते नुकतेच विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

येमली ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावे अतिदुर्गम ओळखले जातात. त्यात कोंदावाही गावाचाही समावेश होतो. या गावात विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी यापूर्वीच केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भाग्यश्री आत्राम यांनी तात्काळ निधी मंजूर करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली. या गावात विविध विकास कामे केली जाणार असून नुकतेच समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष म्हणजे स्वतःचा वाढदिवस असतानाही घरी न थांबता त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी अतिदुर्गम कोंदावाही गाठून समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन केले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा वाढदिवस असल्याने जल्लोषात स्वागत करून सुखद धक्काच दिला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, येमलीचे सरपंच ललिता मडावी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, रामजी कत्तीवार, कोदावहीचे भुमिया दुहे तलाडे, बंडू तलांडे, कोल्लू तलाडे, विजया तंलाडे, संतोष तंलाडे, येमली पेम्मा बिद्री तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जंगी स्वागत –
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नुकतेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यावर त्यांचा एटापली तालुक्यातील हा पहिलाच दौरा होता. त्या अनुषंगाने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे स्वागत केले.

Latest Posts

Don't Miss