Latest Posts

एटीएम फोडण्याचा प्रयत्न : एक आरोपी अटकेत तर एक फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा (Varora) : कीरायाची टवेरा वाहन घेऊन टेमुरडा येथील हायवे लगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. तक्रार प्राप्त होताच वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासामध्ये एकास ताब्यात घेतले तर एक फरार असुन टवेरा वाहन जप्त केले आहे.

माहितीनुसार, एमएच ३१ ईके ४२१४ या क्रमांकाचे टवेरा वाहन नागपूर येथुन मनीष अमरपाल रा. रेवणा ता. जिल्हा घाटमपुर उत्तर प्रदेश, अंकित उर्फ कुलदीप अरविंद पाल रा. अलदा उत्तर प्रदेश यांनी नागपूर येथून किरायाने घेतले. २० ऑक्टोबर च्या रात्री ऑक्टोबरच्या रात्री वरोरा तालुक्यातील टेमुरडा येथील नागपूर चंद्रपूर मार्गालगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

याबाबत शाखा प्रबंधक सिद्धांत नगराळे नगराळे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी पर्यंत पोहोचले. मनीष अमरपाल यास ताब्यात घेतले तर अंकित उर्फ कुलदीप अरविंद पाल फरार असून त्याचा शोध वरोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक घेत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता जनतेने घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे आव्हान वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे, किशोर मीतलवार पोलीस हवालदार दीपक दुधे, दिलीप सुर, अमोल धंदरे, किशोर बोठे, दिनेश मेश्राम, संदीप मुळे, सुरज मेश्राम, फुलचंद लोधी यांनी केली.

Latest Posts

Don't Miss