Latest Posts

हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर…, रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिराेली / वडधा – शेतात येणाऱ्या रानटी हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनाेज प्रभाकर येरमे (३८) यांना रानटी हत्तीने शनिवारी रात्री रस्त्यावर आपटून ठार केले व पायाखाली तुडविले.

एवढ्यावरच हा क्रूरपणा न थांबता हत्तींनी मध्यरात्री पुन्हा मनाेजच्या मृतदेह तुडवत शरीर छिन्नविच्छिन्न केले. तसेच वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकी व बॅगही उचलून फेकल्या.

दाेन्ही हात गायब :
रानटी हत्तींनी मृतदेह छिन्नविच्छिन्न केला. पाय व डाेके घटनास्थळापासून ३० मीटर अंतरावर झुडपात नेऊन टाकले. घटनास्थळी केवळ छातीचा भाग व उजवा पाय हाेता. दुसऱ्या दिवशी दुसरा पाय व डाेक्याचा भाग सापडला; परंतु दाेन्ही हात सापडले नाहीत.

सायकलवरून उतरणार तेवढ्यातच हल्ला :
– हत्तींचा कळप जंगलातून शेतीकडे येत असल्याची माहिती मिळताच मनाेज येरमे हे निमेश मडावी व मनेश टेकाम यांच्यासह रात्री घरून निघाले.
– गावापासून ३०० मीटर अंतरावरच त्यांना हत्ती शेतात जाताना दिसले. हत्ती आपल्याकडे येत असल्याचे पाहून निमेश व मनाेज हे झाडावर चढले.
– मनाेज हे रस्त्यावर सायकल उभी ठेवत असतानाच एका हत्तीने साेंडेत पकडून दाेन वेळा आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला.
– इतर दोघांनी घटनेची माहिती गावात दिली. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. परंतु हत्तींपुढे कुणाचेच काही चालेना.
– दाेन तासांनी हत्ती पुन्हा घटनास्थळाकडे आले.
– तेवढ्यात लाेकांनी गावाकडे पळ काढला. रात्रीच्या ११ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत हत्तींनी मनाेज यांचा मृतदेह पायाखाली तुडवून छिन्नविच्छिन्न केला.

Latest Posts

Don't Miss