Latest Posts

ऑटो व काळी पिवळी वर पोलीस विभागची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरात ऑटो व काळी पिवळी द्वारे वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १६ ऑटो व ३ काळी पिवळी वर पोलीस विभाग तर्फे कारवाई केले.

शहरात नवीन बस स्टँड परिसरात ऑटो चालक द्वारे विरूद्ध दिशेने ऑटो लावणे, प्रवाश्या सोबत वाद विवाद तसेच मुख्य मार्गावर वाहतूक चे उल्लंघन करणे आदी बाबी वर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांना तक्रार केले होते. त्या तक्रार ची दखल घेत पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

आज दुपारच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करीत १६ ऑटो व ३ काळी पिवळी वर २७९, २८३ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केले.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झाडे, पोशी गणेश पुरडकर, पोषी अजय मोहूर्ले, पोशी राहुल धुळसे, पोशी शाहरुख खान यांनी केले.

Latest Posts

Don't Miss