Latest Posts

ऑटो ला ट्रक ची धडक : ऑटो चकनाचूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : येथील किल्ला वार्ड मध्ये एका ट्रक ने उभ्या असलेल्या ऑटो ला मागून धडक दिल्याने ऑटो चकनाचुर झाला आहे.

२१ मार्च रोजी रात्री  ११ वाजताच्या सुमारास ऑटो ला ट्रक ने मागून धडक दिले.  ऑटो चालक मालक उमेश दूपारे हा ऑटो क्र एमएच ३४ डी ६२५६ चा धंदा करून रात्री आपल्या घरा समोर ऑटो ठेवले. रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रक क्र. एमएच ४० सीएम ५६२७ ने मागून धडक दिली. ट्रक मध्ये सामान भरून आहे. ते ट्रक बंगलोर ला जाणार होता अशी माहिती मिळाली. जेव्हा तो ट्रक बंगलोर ला जाणार होता, तर त्या १५ फूट चा गल्ली मध्ये कसा गेला. तेथील नागरिकांनी सांगितले की ट्रक चालक हा दारू पिऊन होता तसेच तो विसापुर मार्गाने आला. ऑटो चे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

Latest Posts

Don't Miss