– पोलीस उपमहानिरिक्षक व पोलीस अधीक्षक यांचे हस्ते दोन कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बॅंक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अॅक्सिस बँकेने ठेवला आहे.
२८ जुन २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी अब्दुल वाहीद अब्दुल हमीद शेख यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होेते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन अॅक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीम ती शगुफ्ता अब्दुल वाहीद शेख यांना आर्थीक मदत स्वरुपात संदिप पाटील पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) यांचे हस्ते २४ जानेवारी २०२४ रोजी १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.
तसेच यापुर्वी ०१ जुलै २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रोशन हरी राऊत यांचे कॅन्सर या आजाराने निधन झाले होेते. त्यांना देखील अॅक्सिस बॅकेच्या मदतीने रोशन हरी राऊत याच्या पत्नी श्रीमती ऊषा हरी राऊत यांना १२ जानेवारी २०२४ रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला होता.
यावेळी पोलीस उपमहानिरिक्षक परिक्षेत्र गडचिरोली (कॅम्प नागपुर) संदिप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक मुर्लीधर नैताम यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.