Latest Posts

बॉल-बॅडमिंटन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

– ६ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी दरम्यान आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हाच्या इतिहासात प्रथमच, शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली, बॉल-बॅडमिंटन फेड्रेशन ऑफ इंडिया, दि महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोशिएशन व बॉल- बॅडमिंटन असोशीएशन गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने वरीष्ट गट बॉल-बॅडमिंटन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ६ जानेवारी २०२४ ते १० जानेवारी २०२४ या दरम्यान शासकीय विज्ञान माहाविद्यालय गडचिरोली, च्या मैदानावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत संपुर्ण भारतातील जवळपास पुरूष व महीला असे ५० संघ उपस्थीत राहणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी २०२४ रोज रविवारला सकाळी ठीक ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेस या कार्यक्रमाला विषेश अतिथी म्हणुन क्रिडा मंत्री संजय बनसोडे हे उपस्थीत राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणुन गडचिरोली विधान क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरी विधान क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे हे उपस्थीत राहणार आहे. तर कार्यक्रमाला भाग्यश्री आत्राम माजी जि.प. अध्यक्ष, डॉ. संतोष चव्हान विभागीय सहसंचालक उ.शि., बॉल-बॅडमिंटन फेड्रेशन ऑफ इंडीयाचे महासचिव वाय. राजाराव, दि महाराष्ट्र बॉल-बॅडमिंटन असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. पि.के. पटेल, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे, नवनियुक्त जिल्हा नियोजन समीती सदस्य लिलाधर भरडकर हे प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी हे भुषवनार आहे.

या स्पर्धेचा जिल्हातील नागरीकांनी आनंद घ्यावा, असे आव्हान दि. महाराष्ट्र बॉल- बॅडमिंटन असोशिएशन चे माहासचिव अतुल इंगळे, बॉल-बॉडमिंटन फेड्रेशनच्या कार्यकारी समिती सदस्या प्रा. रूपाली पापडकर, शासकीय महाविद्यालयाचे क्रिडा संचालक डॉ. सुरज येवतीकर, बॉल- बॅडमिंटन असोशिएशन गडचिरोली चे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव ऋषिकांत पापडकर यांनी केलेले आहे.

Latest Posts

Don't Miss