Latest Posts

बल्लारपूर शहरात वाळू अभावी बांधकामे ठप्प, प्रशासनाने यावर मार्ग काढावा : रवि पुप्पलवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरात अनेक महिन्यांपासून बांधकामासाठी मिळणारा वाळू मिळणे कठिण झाले आहे. परंतु अव्वाच्या सव्वा भावात वाळूचा शहरात अवैध पुरवठा सुरूच आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आम आदमी पक्षाने वारंवार तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केले. असतांना देखील या प्रश्नावर अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी हातमिळवणी तर केली नसेल? असा प्रश्न आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे.

अनेक महिन्यांपासून शहरात बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करत आहे. यात सर्वाधिक अडचण वाळूपुरवठ्याच्या अभावामुळेच निर्माण झाली आहे. शहरातील शेकडो बांधकामे वाळूअभावी बंद पडली आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सामान्य नागरिकांना जर रेतीचा पुरवठा होऊ शकत नसेल तर मग नगरपरिषदेने बांधकामासाठीची परवानगीच द्यायला नाही पाहिजे. जोपर्यंत कायदेशीर रेतीपुरवठा होत नाही तोपर्यंत एक मध्यममार्ग म्हणून शहरात एक समिती नेमून त्यामार्फत रेतीचा पुरवठा सुरू ठेवायला पाहिजे. यामुळे अवैध रेती पुरवठा देखील बंद होईल व नागरिकांची सुद्धा गैरसोय होणार नाही, असे रवि पुप्पलवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss