Latest Posts

बल्लारपूर तालुक्यातील अनेकांचा आम आदमी पार्टीत पक्षप्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शासकीय विश्रामगृहात आम आदमी पार्टीच्या मोठ्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा समिती सदस्य परमजीत सिंग झगडे, विधी सल्लागार ऍड. किशोर पुसलवार, बलराम केसकर आणि विशाल माने युवा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा संघटन मंत्री शंकर अरोरा, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना दीपक बेरशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बल्लारपूरमध्ये आम आदमी पार्टीचा मजबूत पक्षप्रवेश झाल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या वेळी आम आदमी पार्टीची संघटना बांधणी व पक्ष प्रसाराविषयी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गाव पातळीवर आम आदमी पार्टीची संघटना मजबूत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीची मजबूत संघटना उभी राहिली असून, लोकहिताच्या विविध मुद्द्यांवर ही संघटना कार्यरत आहे. दिल्ली येथील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवरच लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या धोरणांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आम आदमी पार्टी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जिल्हा समितीचे निलेश जाधव, शमशेर सिंग चव्हाण, विशाल माने यांच्या सह दीपक वाळके, नागेंद्र शर्मा, दिनेश जयस्वाल, आशिष गेडाम, सुमित ताकसांडे, शंकर अडवाणी, नबी पठाण, इरशाद शेख, अंकुश सुरतीकर, लव सुरवतीकर, देविदास फुलकर, सोनू सय्यद, कालिदास जूनघरे, फिरोज शेख, अहमद शेख, आतिश वैरागडे, इमरान खान, संजय वर्मा, हेमंत ठाकरे, नाना माडमवार, अजय शिवाचे, बंडू मेश्राम, संजय ठाकरे, अर्जुन झांजोटे, सुमित झांजवटे, दत्ता घोणे, दिनेश आसटकर, सुरेश नाडमवार आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss