Latest Posts

बल्लारपूर वेकोलि ने हलक्या वाहन मालकांना न्याय द्यावा : भाजपा कामगार मोर्चाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर वेकोलिमध्ये गेल्या काही काळापासून हलक्या मोटार वाहनाच्या एलएमव्ही निविदा जसे की स्कॉर्पिओ/सुमो इत्यादींच्या बहुतांश निविदा एकल किंवा दुहेरी ऐवजी क्लबिंग करून मोठ्या केल्या आहेत. एकेरी वाहनधारक निविदेत सहभागी होऊ शकत नाहीत. या संदर्भात भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

निविदेचे मूल्यांकन ५० लाख किंवा एक कोटी रुपयांच्या वर जाते. त्यात फक्त मोठ्या कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतात. सिंगल/डबल मोटार मालकांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यातील बहुतांश बल्लारपूर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. वारंवार विनंती करूनही केवळ मोठ्या निविदा काढल्या जात आहेत. वेकीलि मुख्यालय नागपूर कडून अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना नाही आहे. तथापि, या प्रकरणी बल्लारपूर वेकोलि महाव्यवस्थापक  सव्यसाची डे यांनी सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

Latest Posts

Don't Miss