Latest Posts

सलग आठव्यांदा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार 

३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा बँक अव्वल : ५ ऑक्टोबरला वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बँकेच्या आर्थिक स्थितीवर ठेव वृद्धी श्रेणीतील बँको ब्ल्यू रिबन (Banco Blue Ribbon) हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी (in the eighth year) बँकेने हा पुरस्कार पटकावला आहे.

देशभरातील ३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२२-२३ या वर्षांत दोन ते तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या श्रेणीत ठेव वृद्धी, रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेचे एन.पी.ए.चे प्रमाण, सी.आर.ए.आर. आदी निकष पूर्ण करून अव्वलस्थान मिळवले.

या पुरस्काराचे ५ ऑक्टोबरला दमण येथे वितरण होणार आहे. बँकेचे अध्यक्ष प्रचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व संचालक यांनी ठेवीदार व सभासदांना या पुरस्काराचे श्रेय दिले आहे.

मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव –
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक नामांकित पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे सन २०१८ व २०२२ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार व सन २०१६ ते २०२२ पर्यंत बँकेला सलग सात वर्षे बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बँकेला नुकताच सन २०२१-२२ या वर्षात वित्तीय समावेशन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.

तीन हजार कोटींचा टप्पा पूर्ण
– जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५५ शाखा व ३५ ए.टी.एम.च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक बैंकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
– बँकेने ३१ मार्च २०२३ च्या आर्थिक स्थितीवर ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे.

Latest Posts

Don't Miss