Latest Posts

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या तर्फे गडचिरोली येथे एक दिवसीय कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

– गडचिरोली बार असोसिएशन च्या वतीने आमंत्रण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (Bar Council of Maharashtra and Goa) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. खोली क्रमांक ३०६, जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली येथे एक दिवशीय कायदेशीर शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती एम.डब्ल्यू. चांदवानी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय तर सन्माननीय अतिथी आशुतोष करमरकर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उपस्थित राहतील.

सदर कार्यक्रमाचे सकाळी १०.०० ते ११.०० वा उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यानंतर सकाळी ११.१५ ते दुपारी १२.१५ पर्यंत फौजदारी खटला आणि नवीन सुधारित कायदे या विषयावर ॲड. सुदीप पासबोला सदस्य आणि माजी उपाध्यक्ष-बीसीएमजी तर दुपारी १२.३० ते दुपारी ०१.३० सीपीसी, विहंगावलोकन या विषयावर ॲड. जयंत डी. जायभावे सदस्य-बार कौन्सिल ऑफ इंडिया मार्गदर्शन करतील. दुपारी ०१.३० वा – दुपारच्या जेवणाची सुटी अशाप्रकारे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी ॲड. राजेंद्र बी. उमप उपाध्यक्ष-बीसीएमजी, ॲड. संग्राम डी. देसाई अध्यक्ष-CLEP-Com, ॲड. गजानन बी. चव्हाण अध्यक्ष-BLEP-Com, ॲड रवींद्र दोनाडकर अध्यक्ष, गडचिरोली बार असो, ॲड. पारिजात एम. पांडे अध्यक्ष-बीसीएमजी, ॲड. आसिफ एस.कुरेशी पालक सदस्य-नागपूर, ॲड. मोतीसिंग जी. मोहता सदस्य -बीसीएमजी, ॲड. जयंत डी. जायभावे सदस्य-बार कौन्सिल ऑफ इंडिया, ॲड. अनिल एम. गोवारदिपे सदस्य-नागपूर, ॲड. आशिष पी. देशमुख सदस्य-बीसीएमजी यांनी आमंत्रित केले आहे.

यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंद एस. पाटील, ॲड. हर्षद वि.निंबाळकर, ॲड. सतीश ए. देशमुख, ॲड. सुभाष जे घाटगे, ॲड. डॉ. उदय पी. वारुंजीकर, ॲड. अमोल एस. सावंत, ॲड. वसंत डी.साळुंके, ॲड. अण्णाराव जी. पाटील, ॲड. वसंतराव ई. भोसले, ॲड. विवेकानंद एन. घाटगे, ॲड. अहमदखान उ.पठाण, ॲड. मिलिंद एस. थोबडे, ॲड. अविनाश जे. भिडे, ॲड. सुदीप आर पासबोला, ॲड. विठ्ठल बी. कोंडे-देशमुख, ॲड. अविनाश बी. आव्हाड, तर तालुका बार असोसिएशनचे सदस्य ॲड. नितेश लोदल्लीवार सचिव, ओबीए-गडचिरोली, ॲड. राजेंद्रप्रसाद मेंगनवार अध्यक्ष, अहेरी, ॲड. बाळकृष्ण उके अध्यक्ष, वडसा, ॲड गजानन दुग्गा अध्यक्ष, धानोरा, ॲड. अनंता उंदिरवाडे अध्यक्ष, चामोर्शी, ॲड. चंद्रकांत दरेकर अध्यक्ष, आरमोरी, ॲड. प्रमोद बुद्ध अध्यक्ष, कुरखेडा, ॲड. अनंत पोटाला अध्यक्ष, सिरोंचा उपस्थित राहणार आहेत.

Latest Posts

Don't Miss