Latest Posts

मारहाण करुन गंभीररित्या जखमी करणा­ऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

– विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली विकास एस. कुलकर्णी यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस स्टेशन आरमोरी येथे २६ एप्रिल २०२३ रोजी फिर्यादी चेतन प्रकाश ढवळे रा. मानापूर तह. आरमोरी जि. गडचिरोली यांने फिर्याद दिली की, २५ एप्रिल २०२३ रोजी रात्रो ०७:३० वा. चे दरम्यान त्याचे काका विजय ढवळे हे नितिन पान सेंटर मानापूर येथे बसुन असतांना आरोपी नामे अमोल उद्धवराव साखरे (३४) रा. मानापूर, तह. आरमोरी जि. गडचिरोली याने विजय ढवळे यांना काठीने डोक्यावर मारुन रक्त बंबाळ केले. जखमी विजय हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडुन होते. त्याचवेळी आरोपी हा हातात काठी घेवुन चौकामधून फिर्यादीला घराकडे जातांना दिसला. त्यावेळी गावातील नातेवाईकांनी फिर्यादीचे काका यांना पाणी पाजून मौजा देलनवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवुन गेले. त्यानंतर जखमीला गडचिरोली येथे सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात असतांना जखमीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यास नागपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. अशा आशयाच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपी विरुद्ध अप. क्र. १४६/२०२३ कलम ३०७ अन्वये २६ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.

जखमी विजय ढवळे हे बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्यांचे बयान ते शुद्धीवर आल्यानंतर २० एप्रिल २०२३ रोजी नोंदविण्यात आले. त्यात त्यांनी सांगितले की, एक वर्षा अगोदर माझा पुतन्या चेतन ढवळे यांचे घरी पाहुणे आले असता, अमोल साखरे याने पाहुण्यांच्या गाडीचे दोन्ही मिरर (आरसे) तोडुन नुकसान केलेली होती. त्यावेळेस आमचे अमोल साखरे सोबत वाद झाले होते. या कारणावरुन अमोल साखरे याने मला काठीने जबर मारहाण केलेली आहे. सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांचे सुद्धा बयान नोंदविण्यात आले. तपासामध्ये वैद्यकिय अहवालानुसार जखमी यांचे डोक्यावर तीन जखमा आढळुन आल्या. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस नं. ८०/२०२३ नुसार साक्षिदाराचे बयान नोंदविण्यात आले. न्यायालयाने वैद्यकिय अहवाल व वैद्यकिय अधिकारी यांचे सविस्तर बयान नोंदविल्यानंतर जखमीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने मारहाण केल्याचे निष्पन्न झाल्याने आज ०४ जुलै २० २४ रोजी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली विकास एस. कुलकर्णी यांनी आरोपी अमोल उद्धवराव साखरे यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान व सहा. सराकारी वकील सचीन कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्राचा तपास पोनि. संदिप मंडलीक पोस्टे आरमोरी यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss