Latest Posts

ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भारत सरकार, महाराष्ट्र शासन एवंबँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा संस्थेद्वारा निशुल्क ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे ३० एप्रिल २०२४ ते २९ मे २०२४ आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये ब्युटीशियन – संकल्पना आणि व्याप्ती, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायाची संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना या बद्दल मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीकरिता येताना उमेदवारांना शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड सोबत आणने आवश्यक आहे.

प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना जेवण, चाय, नास्ता, वही, पुस्तके व राहण्याची इत्यादी सोय मोफत केली जाईल. स्वयं रोजगाराची आवड व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय १८ ते ४५ वर्षे, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा महिला  मुलाखती करीता ३० एप्रिल २०२४ सकाळी १० वाजता बैंक ऑफ़ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था भंडारा लालबहादूर शास्री (मनरो) शाळेच्या बाजूला, महाबोधी विहाराच्या समोर, शास्री चौक, भंडारा, महाराष्ट्र, ४४१९०४ येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलिंद इंगळे यांनी केले आहे. या करिता संपर्क क्र. ९५११८७५९०८, ८६६९०२८४३३, ९७६६५२२९८४, ८४२१४७४८३९.

ऑनलाइन अर्ज : https://forms.gle/vNLLEurPUv2RYMBr8

Latest Posts

Don't Miss