Latest Posts

पीएफच्या नियमात झाला मोठा बदल : नोकरदारदारांचा झटक्यात मिटला ताण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : नोकरदारांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयात मिठाई वाटावी अशी वार्ता आहे. ईपीएफओने (EPFO) पीएफ नियमात बदल केला आहे. या बदलामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांचा मनस्ताप गेला आहे.

त्यांची ससेहोलपट आता थांबणार आहे. त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करुन करावी लागणारी धावपळ एकदाची थांबली आहे. पीएफ खात्याने नियमांत मोठा बदल केला आहे. त्यामुळे वारंवार अथवा तीन-चार वर्षांना नोकरी बदलणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१ एप्रिलपासून बदलला नियम –
१ एप्रिलपासून ईपीएफओने खातेदारांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता PF ट्रान्सफर करण्याची झंझट संपली आहे. जर एखादा पीएफ खातेधारक नोकरी बदलत असेल तर त्याचे पीएफ आपोआप हस्तांतरीत होईल. त्यासाठी खातेदाराला धावपळ करण्याची कागदपत्र जमा करुन प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज उरणार नाही. पीएफ हस्तांतरीत करण्यासाठी त्याला फॉर्म क्रमांक ३१ भरण्याची गरज नाही. या सुविधेमुळे पीएफ खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएफ खातेदारांना मोठा दिलासा –
आतापर्यंत नोकरी बदलणे एकदम सोपे होते. पण पीएफचे खाते हस्तांतरीत करणे तेवढचे जिकरीचे होते. पीएफ खात्यातील जमा रक्कम त्याला नवीन नोकरीच्या पीएफ खात्यात हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. त्यासाठी त्यांन एक खास फॉर्म ३१ भरावा लागत होता. जुन्या एचआर विभागाला वारंवार विचारणा करावी लागत होती. युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक असतानाही ग्राहकांना नोकरी बदलली की ही औपचारिकता करावी लागत होती. आता नोकरी बदलल्यावर खातेदाराच्या पीएफ खात्यातील पैसे आपोआप दुसऱ्या कंपनीच्या पीएफ खात्यात जमा होतील.

वेतनाच्या १२ टक्के योगदान –
ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना पीएफसाठी त्यांच्या मुळ वेतनातील १२ टक्के योगदान देणे आवश्यक आहे. या खात्यासाठी कंपनीला, नियोक्त्याला पण योगदान द्यावे लागते. भविष्य निधी म्हणजे पीएफ (Provident Fund) गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. जवळपास सर्वच कर्मचारी पीएफमध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळवून देते.

Latest Posts

Don't Miss