– ८ ऑक्टोबरपूर्वी जमा करता येणार कागदपत्रे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांनी आपले मंजुरी आदेश टोकन, आधार कार्ड, बँक पास बुक, मोबाईल क्रमांक व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र तत्काळ मनपा झोननिहाय तलाठी यांचेकडे ८ ऑक्टोबरपूर्वी जमा करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यापुढे मिळणारे अनुदान हे डीबीटी प्रणालीद्वारेच पाठविण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. यापुर्वी नागपूर महानगरपालिकेत शिबिर आयोजित करून देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत. ज्या पात्र लाभार्थ्यांनी आजवर कागदपत्रे जमा केली नाहीत त्यांनी ८ ऑक्टोबरपूर्वी कागदपत्रे जमा करावीत. अन्यथा अनुदान डीबीटी पोर्टलमध्ये डाटा एन्ट्री होईपर्यंत स्थगित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.