– साईबाबा देवस्थान समिती, आलापल्ली द्वारा भागवत सप्ताहाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, असे आवाहन माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
साईबाबा देवस्थान समिती आलापल्ली द्वारा आयोजित बालयोगी गोपाल महाराज यांच्या भागवत सप्ताह कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी नुकतेच उपस्थिती दर्शविली व कथेचे श्रवण करून विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाविक, सेवा समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री साईबाबा देवस्थान सेवा समिती अल्लापल्ली द्वारा या ठिकाणी १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाग्यश्री ताई आत्राम यांनी नुकतेच १९ ऑक्टोबर या ठिकाणी उपस्थिती दर्शविली व साईबाबा देवस्थान सेवा समितीच्या सदस्यांशी आस्थेने संवाद साधत कार्यक्रमाबद्दल विचारपूस केल्या.