Latest Posts

महाशिवरात्री निमित्त भाग्यश्री आत्राम यांनी कालेश्वरम मंदिरात घेतले दर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : लगतच्या तेलंगाणा राज्यातील भूपालपल्ली जिल्ह्यात समाविष्ट कालेश्वरम येथील प्रसिद्ध मंदिरात महाशिवरात्री निमित्त माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी दर्शन घेतले.

भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी कालेश्ररम येथे शिवलिंग आहे. भारतात एकाच पीठावर कालेश्वर – मुक्तेश्वर दोन जोड लिंग एकत्र दर्शन मिळणारे एकमेव मंदिर आहे. भाविक इथे बाराही महिने दर्शनासाठी येतात. महाशिवरात्री निमित्त याठिकाणी लगतच्या विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि शाहीस्नान करून दर्शन घेऊन जातात. आज महाशिवरात्री निमित्त भाग्यश्री आत्राम यांनी देखील कालेश्वरम मंदिरात दर्शन घेतले.

अत्यंत पुरातन काळापासून काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त भाविक शुक्रवारी पहाटेपासूनच शिवनाम स्मरणाने गोदावरीत पुण्य स्नानासाठी गर्दी केली होती. भाग्यश्री आत्राम यांनी देखील उपस्थित राहून हरहर महादेवच्या गजरात कालेश्वर -मुक्तेश्वर आणि माता पार्वती देवी दर्शन घेतले. यावेळी सिरोंचा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss