Latest Posts

भामरागड येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन : १३ व्या दिवशी सुध्दा ठेवले चालू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : आज ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी तालुका भामरागड येथील आरोग्य कर्मचारी यांनी आंदोलन १३ व्या दिवशी सुध्दा चालू ठेवले असून ३० ऑक्टोबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे सर्व राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी सरसकट समायोजन करिता कृती समितीच्या नेतृत्वात सहभागी झालेले होते.

आरोग्य मंत्री यांनी ३०% पद्धतीने ३ टप्यात समायोजन करण्यात येईल व जेव्हा जेव्हा भरती निघेल त्यात समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिलेले आहेत. परंतु सर्व कर्मचारी यांचे समायोजन सरसकट करून जो पर्यंत समायोजन अध्यादेश शासन काढणार नाही. तो पर्यंत संप मागे घेणार नाही अशी, ठाम भूमिका कृती समिती याने घेतली आहे.

Latest Posts

Don't Miss