विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. स्वाधार योजनेंतर्गत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक स्वाधारची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यात येते. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.