Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना नवीन व नूतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ व २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच आपल्या अर्जातील त्रुटीची पुर्तता एसएमएस प्राप्त झाल्याच्या १८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे समक्ष सादर करावा. दिलेल्या मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच सन २०२४-२५ या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज वसतीगृह लॉगीन व इतर कारणामुळे अपात्र झाले आहेत व ज्यांचे अर्ज अलॉटमेंट पेडींग, रिजेक्ट, अंडर स्क्रुटनी, वेटींग मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी सदरचे अर्ज विद्यार्थी लॉगीनवर त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात येत आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरते वेळेस जे मेल आयडी जोडलेले आहेत. त्यावर सेड बॅक टू अप्लीकन्ट असे मेल आलेले आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज व्यवस्थित निकषानुसार सर्व कागदपत्र जोडून अर्ज त्रुटी मध्ये आल्यानंतर ७ दिवसाच्या आत सदर अर्जाची एक प्रत आपल्या प्रवेशित महाविद्याल्यात सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss