Latest Posts

भार्गवी बोरकर एसएससी परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम स्थानी

– पुर्नपरिक्षणात दोन विषयात गुणांची वाढ
– नवरगांव येथील भारत विद्यालयाचा चौथ्यांदा जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालय येथील विदयार्थीनी भार्गवी अनिल बोरकर हीने नुकत्याच एसएससीच्या निकालात बेस्ट फाईव्हमध्ये ५०० पैकी ४८६ गुण प्राप्त करीत ९७.२० टक्के गुण मिळाल्याने एसएससी च्या परीक्षेत जिल्ह्यातून गुणानुक्रमे द्वितीय आली होती.

त्यानंतर भार्गवीच्या पालकांनी पुनःपरीक्षणासाठी सामोरे जायचे ठरवले आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चक्क इतिहास विषयात १ तर भूगोल विषयात तिचे ७ गुण वाढले असल्याने ५०० पैकी ४९४ गुण झाल्याने एकूण गुणांच्या टक्केवारीत ९८. ८० टक्के गुण झाले असल्याने एसएससी परिक्षेत जिल्हयातून प्रथम असल्याचा दावा पालकाच्या वतीने करण्यात येत आहे .

त्यामुळे चौथ्यांदा चंद्रपूर जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान आपल्या भारत विद्यालयाला प्राप्त झाला आहे. दहावीच्या परिक्षेत जिल्हयातून प्रथम येण्याचा मान भार्गवी अनिल बोरकर हिला मिळाल्याने कौतूकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss